Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्हा रुग्णालयात आणखी दोन संशयित रुग्ण दाखल

जळगाव : जिल्हा रुग्णालयात आणखी दोन संशयित रुग्ण दाखल

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात रविवारी दोन संशयितांना दाखल करण्यात आले. त्यांच्या लाळीचे नमुने घेवून ते पुण्याला तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
आतापर्यंत एकूण २२ जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील १५ जणांचे निगेटीव्ह आले आहे. तर दोन जणांचे नमुने निकषात न बसल्याने त्यांची तपासणी करण्यात आली नाही. तर पाच नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहे. 

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्ष एकूण दोन आहेत. यात शनिवारचे तीन आणि रविवारचे दोन संशयित रुग्ण दाखल आहेत. या रुग्णालयात रविवारी दाखल झालेले हे दोघं तरुण २६ ते २९ वयोगटातील आहे. ते दुबईहून घरी परत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात येवून स्वेच्छेने तपासणी करुन घेतली. त्यांचे अहवाल उद्या रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...