Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 25 हजार पार

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 25 हजार पार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 25 हजार 93 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गुरुवारी करोना पॉझिटिव्ह 708 रुग्ण आढळले.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 149 रुग्ण, जळगाव ग्रामीणमधील 11, भुसावळ येथील 43, अमळनेरातील 92, चोपडा येथील 100, पाचोरा येथील 30, भडगावातील 13, धरणगावातील 38, यावल येथील 13, जामनेरातील 49, रावेर येथील 38, पारोळ्यातील 78, चाळीसगाव येथील 26, मुक्ताईनगरातील 18, बोदवड येथील 5, परजिल्ह्यामधील 5 रुग्णांचा समावेश आहे

जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 525 रुग्ण करोनामुक्त झाले. यातील 420 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 6 हजार 790 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण 778 रुग्ण दगावले. यातील 13 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 1, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 6, रुबी हॉस्पिटलमध्ये 1, मुक्ताईनगरात 1, भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 1, रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात 1, चाळीसगाव येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 80 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यामधील 67 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 52, 65 व 66 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील 60, 72 वर्षीय पुरुष आणि 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रावेर तालुक्यामधील 60 वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष आणि मुक्ताईनगर तालुक्यामधील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या