Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात करोनाचा कहर मंदावतोय

जिल्ह्यात करोनाचा कहर मंदावतोय

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील कमी झाली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 410 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला असून 756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा कहर मंदावतोय असे दिसून येत आहे.

जिल्ह्यात आज 21 मे रोजी दिवसभरात 410 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 37 हजार 546 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 756 रुग्ण करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 26 हजार 289 इतकी झाली आहे.

नवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 30, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 27, अमळनेर 26, चोपडा 42, पाचोरा 45, भडगाव 5,धरणगाव 14, यावल 5, एरंडोल 3, जामनेर 44, रावेर 22,पारोळा 10, मुक्ताईनगर 43, चाळीसगाव 48, बोदवड 24 आणि इतर जिल्ह्यातील 3 असे एकूण 410 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू होणार्‍यांची संख्या घटली

गेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून शुक्रवारी जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रावेर व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर मुक्ताईनगर, एरंडोल, धरणगाव, जळगाव व पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 469 इतकी झाली आहे.

956 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 956 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या