Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात पाच तालुक्यात 13 रुग्ण

जिल्ह्यात पाच तालुक्यात 13 रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोना संक्रमाणाची तीव्रता कमी होत असल्याने जिल्हावासीयांना सुखद अनुभव अनुभवायला मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisement -

शुक्रवारी 10 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नसून जिल्ह्यात पाच तालुक्यात 13 रुग्ण आढळून आलेले आहेत. तर दुसरीकडे 29 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 2, भुसावळ 2, धरणगाव 1, पारोळा 1, चाळीसगाव 4, मुक्ताईनगर 1, इतर जिल्ह्यातील 2 असे 13 रुग्णांचा समावेश आहे. तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, बोदवड या 10 तालुक्यांमध्ये श ुक्रवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 500 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 796 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच सद्यस्थितीला जिल्ह्यात 129 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या