Thursday, May 2, 2024
Homeजळगावदुचाकीचोर बांडुक गँगच्या प्रमुखासह अटकेत

दुचाकीचोर बांडुक गँगच्या प्रमुखासह अटकेत

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील शनिपेठ परिसरातून दुचाकी चोरणार्‍या याच परिसरातील बांडुक गॅगंचा प्रमुख शुभम उर्फ बांडुक शिवराम मिस्तरी वय 20 रा. वाल्मिकनगर, जळगाव व त्याचा साथीदार राहूल रविंद्र कोळी वय 19 रा. मेस्कोमातानगर, जळगाव या दोघांना आज मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बांडुक गँगचा प्रमुख शुभम मिस्तरी हा त्याच्या मित्रासोबत हा शनिपेठ परिसरात दुचाकी चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

त्यानुसार बकाले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, वसंत लिंगायत, उमेशगिरी गोसावी यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.

असोदा रेल्वेगेटकडी हरीओम नगर, कलावसंत नगर भागात संशयितांचा शोध घेत असतांना पथकाला विनानंबर प्लेटच्या दुचाकीवरुन फिरतांना शुभम मिस्तरी व राहूल कोळी हे मिळून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या