Friday, May 3, 2024
Homeजळगावशेतीच्या व्यवहारात 11 लाखांची फसवणूक

शेतीच्या व्यवहारात 11 लाखांची फसवणूक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शेतजमिनीवर मॅनेजर मामलेदाराचे नाव असून ते कमी करुन ती शेतजमीन स्वस्तात मिळवून देतो असे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी करीत रमेश काळू चौधरी रा. नित्यानंद नगर यांची 11 लाखात फसवणु केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील जळू शिवारातील शेतजमिन गट नं 246 यावर तालुक्यातील मॅनेजर मामलेदार यांचे नाव होते. या मिळकतीबाबत पाडुरंग दगा पाटील यांनी मॅनेजर मामलेदार यांचे नाव कमी करुन ती जमिन स्वस्तात खरेदी करु देतो असे रमेश काळू चौधरी यांना सांगितले.

याबाबत 24 नोव्हेंबर 2011 मध्ये बेचनपावती करीत सौदापावती व करारनामा करुन दिला होता. या शेतजमिनीचा सौदा हा 11 लाख रुपयात झाला होता तर त्यावर जमिनीचे मूळ मालक पाडूरंग दगा पाटील यांनी संमतीम्हणून सही देखील केली होती. या व्यवहारापोटी रमेश चौधरी यांनी पांडूरंग पाटील यांच्या सांगण्यावरुन विनायक भालचंद्र ठाकूर यांना बयाणा म्हणून 2 लाखाचा चेक तर 1 लाख रुपये रोख दिले होते. तसेच उर्वरीत रक्कम ही खरेदीखतावेळी देण्याचे ठरले होते.

नाव कमी करण्याच्या कारणावरुन पैशांची मागणी

शेतजमिनीवरील नाव कमी करण्यासाठी पैसे लागत असल्याचे कारण सांगून विनायक ठाकूर यांनी 26 जानेवारी 2012 रोजी चौधरी यांच्याकडून 2 लाख रोख घेतले होते त्याची बेचेन पावती देखील त्यांनी करुन दिली होती. तसेच त्यांनी पुन्हा पैसे मागितल्याने चौधरी यांनी त्यांना 17 डिसेंबर 2012 रोजी दीड लाख रुपयांचा चेक तर 50 हजार रुपये रोख दिले होते. तसेच काही दिवसानंतर पांडूरंग पाटील यांनी आर्थिक अडचण असल्याचे सांगत 4 लाख रुपयांची मागणी केली होी. याबाबतची पावती त्यांनी 27 जून 2013 रोजी करुन दिली होती.

खरेदीसाठी बांधिल असल्याचे पावतीत केले नमूद

बेचेन पावती करारनाम्यानूसार 11 लाख रुपये त्यांना मिळाले असल्याचे त्यांनी केलेल्या बेचेन पावतीमध्ये नमूद केले आहे. तसेच सातबार्‍यावर नाव लागल्यानंतर लागलीच खरेदीखत लिहून व नोंदवून देण्यास बांधित असल्याचे त्यांनी 27 जून 2013 करुन दिलेल्या भरणापावतीमध्ये त्यांनी कबुल केले आहे.

उपविभागिय अधिकार्‍यांनी दिले मूळ मालकाचे नाव लावण्याचे आदेश

या शेतजमिनीवर पांडुरंग पाटील यांनी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या कार्यालयात जावून त्या मिळकतीवर असलेले मामलेदार मॅनेजरचे नाव कमी करून त्यावर मूळ मालक म्हणून नाव लावण्यासाठी 19 ऑगस्ट 2019 रोजी अर्ज केला होता. उपविभागीय अधिकार्‍यांनी त्यावरील मामलेदारचे नाव कमी करुन मिळकतीच्या सातबार्‍यानुसार मूळ मालक पांडूरंग दगा पाटील यांचे नाव लावण्याचे आदेश दिले. त्यानुसान पांडूरंग पाटील यांचे त्या शेतजमिनीच्या उतार्‍यावर नाव लागले होते.

नोटीस घेण्यास मूळ मालकाचा नकार

ती शेतजमिन मूळ मालकाच्या नावावर झाली असता ती खरेदीखत तयार करुन देण्यासाठी चौधरी हे विनायक ठाकूर व पांडूरंग पाटील यांची सतत भेट घेत तुम्हाला संपूर्ण रक्कम दिली आहे मला खरेदीखत करुन द्या अशी विनंती करीत होते. याबाबत त्यांनी अ‍ॅड. राजेश सोनवणे यांच्यामार्फत 6 ऑक्टोंबर 2020 रोजी नोटीस पाठविली परंतू त्यांनी ही नोटीस घेण्यास नकार दिला होता.

अतिरीक्त पैशांची मागणी करीत केली फसवणूक

चौधरी यांनी विनायक ठाकूर व पांडुरंग पाटील यांची 4 मार्च 2021 रोजी शेतजमिन खरेदी करुन द्यावी अन्यथा तुमच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल अशा आशयाची नोटीस पाठविली होती. परंतु त्या दोघांकडून नोटीसीला कुठलेच उत्तर मिळाले नाही. तसेच बेचनपातीनुसार शेतजमिन खरेदी करणे बंधनकारक असतांना जमिनीचे भाव वाढलेले असल्याने अतिरीक्त पैशांच्या मागणी करुन रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन विनायक भालचंद्र पाटील रा. एरंडोल व पांडूरंग दगा पाटील रा. गिरणा कॉलनी चोपडा या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या