Thursday, May 2, 2024
Homeजळगावगेंदालाल मिलमधून 20 लीटर गावठी दारु जप्त

गेंदालाल मिलमधून 20 लीटर गावठी दारु जप्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील गेंदालाल मीलमधील गावठी दारुच्या अड्डयावर आज सोमवारी सायंकाळी शहर पोलिसांनी छापा टाकला आहे.

- Advertisement -

या कारवाईत पोलिसांनी 2 हजार रुपयांची गावठी जप्त केली असून सविता भिकन कोळी, वय 36 रा. गेंदालाल या गावठी दारुची विक्री करणार्‍या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेंदालाल मिल मध्ये सविता भिकन कोळी ही बेकायदेशी गावठी दारु विक्री करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार आज सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, रतन गीते, प्रणेश ठाकूर, तेजस मराठे व महिला पोलीस स्वप्नाली उमाकांत सोनवणे यांच्या पथकाने गेंदालाल मिलमध्ये छापा टाकला.

कारवाई करुन पोलिसांनी 20 लिटर गावठी दारु जप्त केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस स्वप्नाली सोनवणे यांच्या फिर्यादीवरन गावठी दारु विक्री करणार्‍या सविता भिकन कोळी हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या