Friday, May 3, 2024
Homeजळगावपारोळा येथील दुचाकी चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

पारोळा येथील दुचाकी चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

धरगणाव तालुक्यातून दोन दुचाकी दुचाकी चोरणार्‍या पारोळा येथील तीन संशयितांना आज मंगळवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील दोनही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार 2020 व 2021 मध्ये दाखल धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, विनायक पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांचे पथक नियुक्त केले होते.

पारोेळा येथील चेतन योगेश पाटील याने धरगावातून दुचाकी चोरल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने चेतन पाटील याला ताब्यात घेतले, त्याने चौकशीत दुचाकी चोरीची कबूली देवून इतर साथीदारांची नावे सांगितली. पथकाने साथीदार सागर रविंद्र पाटील रा. शनीमंदिरी पारोळा, यालाही अटक केली. सागर व चेतन या दोघांनी दोन दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले.

दरम्यान या दोघांकडून चोरीची दुचाकी खरेदी करणार्‍या विक्रम अरुण गायकवाड रा. पारोळा यालाही गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. तिघांकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सांनी आरोपी केले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. तिघांकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.लसांनी आरोपी केले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. तिघांकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या