Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : हवेत फायरिंग केल्याप्रकरणी तिघांना अटक

जळगाव : हवेत फायरिंग केल्याप्रकरणी तिघांना अटक

जळगाव – Jalgaon

शहरातील काळेनगरजवळील उस्मानिया पार्क परिसरात गुरुवारी सायंकाळी दोन तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन दोन गटात झटाफट होऊन हवेत फायरिंग करणार्‍या मद्यपी चौघांना शहर पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

त्यांच्या ताब्यातील दोन गावठी बनावटीचे कट्टेसुद्धा हस्तगत करण्यात आले आहे. यात माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलासह तीन संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिती अशी की, शहरातीलशिवाजीनगराजवळील काळेनगर, उस्मानिया पार्क परिसरात एका विहिरीजवळ संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय-३०) रा. क्रांती चौक, शिवाजीनगर, मिलिंद शरद सकट (वय-२७) रा.गेंदालाल मिल, मयुर उर्फ विकी दीपक अलोणे (वय-२६) रा.आर.वाय.पार्क आणि इम्रान उर्फ इमु शहा रशिद शहा (वय-२८) रा. गेंदालाल मिल हे चौघे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बियर पीत बसले होते.

यावेळी दोन तरुण त्यांच्या समोरून जात असतांना यातील मयूर अलोणे याने कोठे जात आहात? असे विचारल्याने दोघात वाद झाला. वादाचे रुपांतर थोड्यावेळात हाणामारीत झाले. मयूरने बियरची बाटली फेकुन मारली. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुफियान शकिल बेग मिझा (वय-२२) रा. शिवाजीनगर हुडको यांच्या उजव्या डोक्याला मार लागल्याने रक्त वाहत होते. त्याचदरम्यान मयूर अलोणे याने त्याच्याजवळील गावठी कट्ट्यातून हवेत दोन फायरिंग केले आणि तेथून चौघांनी पळ काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या