Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : ललित कोल्हे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : ललित कोल्हे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक ललित कोल्हे यांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांच्यावर आरएचएम गोरजाबाई जिमखान्याजवळ १६ जानेवारी रात्री साडेआठ वाजता प्राणघातक हल्ला झाला होता. यात साहित्या गंभीर जखमी झाले होते. साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी वाहन त्यांनी कोल्हे यांना दिले होते. हे वाहन परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी वाद घातला. कोल्हे यांनी खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. हा वाद चिघळला. कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात कोल्हे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेनंतर ललित कोल्हे फरार होते. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार महिने सात दिवसांनी श्रद्धा कॉलनीत बुधवारी रात्री १० वाजता अटक केली. या अगोदर त्यांच्या साथीदारांना अटक झालेली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रवीण कोल्हे याच्यासह अटकेतील पाचही संशयितांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना जामीन मिळावा, यासाठी अर्ज केले होते. ते अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळले आहेत.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...