Friday, May 3, 2024
Homeराजकीयनगरसेवक पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या अफवाच

नगरसेवक पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या अफवाच

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवार 11 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवेसेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी जळगावातील नगरसेवकांची शुक्रवार 9 जुलै रोजी महापालिकेत महापौरांच्या दालनात बैठक घेतली.

- Advertisement -

जळगाव शहर शिवसेनेत गटबाजी असल्याच्या किंवा काही नगरसेवक पुन्हा भाजपकडे जाणार असल्याच्या निव्वळ वावड्या काही लोकांकडून जाणीवपूर्वक उडवल्या जात असाव्यात मात्र त्यात काहीच तथ्य नाहीय असे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना विलास पारकर यांनी सांगितले.

यावेळी महापौर जयश्री महाजन , उपमहापौर कुलभुषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन , माजी शहरप्रमुख गजानन मालपुरे , गटनेते दिलीप पोकळे , उप गटनेते चेतन सनकत नगरसेवक नवनाथ दारकुंडे , सचिन पाटील , पार्वताबाई भिल यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.

बैठकीतनंतर पत्रकारांशी बोलतांना विलास पारकर म्हणाले की, भाजप मधून शिवसेनेत आलेले नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर आलेले आहेत काही तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास आम्ही करू आणि हे नगरसेवक अडचणीत येऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे, शिवसेनानेते संजय राऊत हे सगळे या नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याची ग्वाही मी देतोय. जळगाव शहर

शिवसेनेत गटबाजी असल्याच्या, किंवा काही नगरसेवक पुन्हा भाजपकडे जाणार असल्याच्या निव्वळ वावड्या काही लोकांकडून जाणीवपूर्वक उडवल्या जात असाव्यात मात्र त्यात काहीच तथ्य नाहीय हे मी निक्षून सांगू इच्छितो नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौर्‍यावर आल्यावर उद्या महापालिकेतसुद्धा भेट देणार आहेत ते इथल्या नगरसेवकांची बैठकही घेणार आहेत , सर्वच नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेणार ऐकूण घेणार असल्याचे ते म्हणाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या