Friday, May 3, 2024
Homeजळगावगाळेधारकांना चार दिवसाचा अल्टीमेटम

गाळेधारकांना चार दिवसाचा अल्टीमेटम

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत 2012 ला संपुष्टात आली आहे आहे.

- Advertisement -

तेव्हापासून जवळपास 2376 गाळेधारकांकडे थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी मनपा प्रशासनाने गाळेधारकांना नोटीसा बजावल्या आहेत.

तसेच प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या आहेत. तरीही देखील थकबाकीचा भरणा केलेला नाही.त्यामुळे मनपाच्या पथकाने काही व्यापारी संकुलातील गाळेधारकांना आज तोंडी सूचना देवून थकबाकी भरण्यासाठी चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.

चार दिवसात थकबाकी न भरल्यास दि.8 मार्चपासून सीलची कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

मनपाच्या 18 व्यापारी संकुलातील 2376 गाळ्यांची मुदत संपल्यामुळे प्रशासनाने संबंधित गाळेधारकांना नोटीसा बजावल्या होत्या. काही गाळेधारकांनी थकीत भाडे धनादेशाद्वारे भरणा केलेला आहे. तर काही गाळेधारकांनी अद्यापही भरणा केलेला नाही.

त्यामुळे मनपा प्रशासनाने पून्हा थकबाकी भरण्याबाबत इशारा दिला आहे.परिणामी करोनाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेले गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फेबु्रवारी महिन्यात मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्यासह काही गाळेधारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून मार्ग काढण्याबाबत निवेदन दिले.

त्यावर पालकमंत्र्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान,मनपा उपायुक्त प्रशांत पाटील,संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र चौधरी,गौरव सपकाळे यांच्या पथकांनी बुधवारी पून्हा शहरातील महात्मा गांधी मार्केट,चौबे मार्केट,धर्मशाळा,सेन्ट्रल फुले मार्केट आणि जूने बिजे मार्केटमध्ये जाऊन गाळेधारकांना थकबाकी भरण्याची सूचना दिली. तसेच चार दिवसात थकबाकी न भरल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

गाळेधारकांमध्ये खळबळ

मनपा प्रशासनाने आठ दिवसात थकबाकी भरण्यासाठी गाळेधारकांना मुदत दिली आहे.थकबाकी न भरल्यास 8 मार्चपासून सीलची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मनपा प्रशासनाने अवाजवी बिले दिल्याचा आरोप गाळेधारकांकडून होत आहे. मागील आठवड्यात मनपा मार्केट गाळेधारका संघटनेची बैठक झाली होती.

मनपा अधिनियम 1949 चे कलम 152 प्रमाणे गाळेकरार नुतनीकरण किंवा गाळेलिलाव करण्यापूर्वी अविकसीत 14 मार्केटमधील सर्व गाळेधारकांची संपूर्ण रक्कम निर्लेखित करण्याची मागणी केली आहे.

तसेच मनपाने कारवाई केल्यास गाळेधारक आपल्या कुंटुबियांसह आंदोलन करेल असा इशारा गाळेधारक संघटनेने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या