Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकJalgaon News : हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात...

Jalgaon News : हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

भुसावळ | प्रतिनिधी | Bhusawal

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) सर्वात मोठे असलेल्या हतनूर धरणाचे (Hatnur Dam) २४ दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तापी नदीपात्रात (Tapi River Bed) पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती हतनुरचे अभियंता भावेश चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) तसेच विदर्भात व तापी पूर्णा व त्यांच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तापी नदी पात्रात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे (Dam) २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे व नदीपात्रात ४९७१ क्युमेक्स क्षमतेने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

YouTube video player

दरम्यान, तापी नदी लगत गावात राहत असलेल्या नागरिकांनी (Citizen) सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला असून गुरे ढोरे नदीपात्राजवळ नेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...