Saturday, November 16, 2024
Homeशैक्षणिकजळगाव : रायपूर जि.प.शाळेत पालकांना पोषण आहार धान्य वाटप

जळगाव : रायपूर जि.प.शाळेत पालकांना पोषण आहार धान्य वाटप

रायपूर, ता.जळगाव । वार्ताहर

राज्य सरकारने शासन परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांना वितरण करणेबाबत जि. प. शाळांना आदेश देऊन तो विद्यार्थी यांना वाटप करण्याचे सांगितले होते. गटशिक्षणाधिकारी पं.स.जळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार जि.प.प्रा.शाळा रायपूर, ता.जि. जळगाव येथे शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ व डाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना समितीच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात आले.

- Advertisement -

धान्य घेण्यासाठी आलेले पालक यांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेत सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटायझर, कोरोना प्रतीबंधात्मक उपाय योजनांचा वापर करत धान्य वाटप करण्यात आले.

शाळेत धान्य वाटप करतांना शाळेचे मुख्याध्यापक मिलींद कोल्हे, शा. व्य. समिती अध्यक्ष पुष्पाबाई सीताराम परदेशी, शिक्षकवर्ग अरुण सोनवणे, छाया राजपूत, शोभा पाटील, चित्रालेखा वायकोळे, मनिषा जावळे, भारती शिंपी, कामिनी पाटील, जगदिश जाधव, वर्षा ठाकरे, निर्मला विधाते तसेच कोरोना जनजागृती समितीतील पदाधिकारी व सदस्य सरपंच ताराबाई परदेशी, आरोग्यसेवक सुनील ढाके, आशा स्वयंसेविका पुनम परदेशी, पोलीस पाटील रामसिंग परदेशी, ग्रामसेविका पल्लवी मोरे, पोलीस पाटील रामिंसंग परदेशी, ग्रा.पं. कर्मचारी सतीष शेनफडू परदेशी, सीताराम परदेशी, भिमसिंग सांडू परदेशी, नकुल गंगाराम कोळी, उपसरपंच प्रवीण लक्ष्मण परदेशी, दिलीप शालीग्राम परदेशी, मन्नूसिंग परदेशी, रामसिंग रतन परदेशी, प्रदीप लक्ष्मण परदेशी, शामा सांडू परदेशी, श्री.धनगर, मनोज परदेशी, नितीन सपकाळे आदींनी सहकार्य केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या