Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : दोन एस.टी.बसच्या मध्ये सापडल्याने चार्जमनचा मृत्यू

जळगाव : दोन एस.टी.बसच्या मध्ये सापडल्याने चार्जमनचा मृत्यू

जळगाव –
नेरी नाक्याजवळील विभागीय एसटी वर्कशॉपमध्ये दुरुस्त करण्यात आलेली एस.टी.बस चालक मागे घेत असताना धक्का लागून वर्कशॉपमधील चार्जमनचा दोन्ही बसमध्ये दबून आज रविवारी दि.१४ रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

वर्कशॉपमधील चार्जमन भिकन शंकर लिंडायत (वय 57, रा.एसटी कॉलनी) हे दुरुस्त करण्यात आलेल्या एका बसवरील चालकाला हाताने दिशा दर्शवत होते.

- Advertisement -

मात्र, मागे लावलेल्या दुस-या बसचा अंदाज आला नाही. याचवेळी चालकाने बस वेगाने मागे घेतल्याने लिंडायत यांना धक्का लागला, यात ते दोन्ही बसमध्ये दाबले गेले.

त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मु्त्यूची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या