Friday, November 15, 2024
Homeराजकीयजामखेड : मस्जिद, मंदीर उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन

जामखेड : मस्जिद, मंदीर उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

राज्यातील बंद असलेले मंदिर व मस्जिद उघडावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर व मस्जिद समोर जामखेड ला निषेध आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

जामखेड येथील खर्डा चौकातील मक्का मस्जिद समोर अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी अमजद पठाण म्हणाले आघाडी सरकार धार्मिक स्थळावर बंधने आणून उघडू दिली जात नाही परंतु दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली जाते. सरकारने मज्जीद व मंदिर उघडण्यास परवानगी न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मज्जीद समोरील आंदोलन आटोपून भाजपचे सर्व पदाधिकारी येथील शनी चौकात मारूती व शनी मंदिर समोर आंदोलन केले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सभापती रवी सुरवसे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, उपाध्यक्ष शाकिर खान, अँड. प्रविन सानप, युवा मोर्चा अध्यक्ष पै शरद कार्ले ,शहर अध्यक्ष नगरसेवक बिभिषण धनवडे, नगरसेवक आमित चिंतामणी , युवामोर्चा शहर अध्यक्ष अभयराजे राळेभात ,जिल्हा परिषद सदस्य, सोमनाथ पाचरणे, आनिल लोखंडे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, संचालक मकरंद काशिद, धामणगाव सरपंच महारूद्र महारनवर, युवामोर्चा उपाध्यक्ष मोहन गडदे, महेश नेटके, हाबिब शेख, सलिम तांबोळी, अल्पसंख्या मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष फैयाज शेख, ता. अध्यक्ष कमाल शेख, युवामोर्चा ता. सरचिटणीस शरद हजारे, आर्जुन म्हेत्रे, श्रीराम डोळे, प्रविन कार्ले, आप्पा ढगे, आशिफ शेख, जैयद खान आस्लम खान, सोहेल शेख, उबेद बागवान, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या