Sunday, July 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजजम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

श्रीनगर । Shrinagar

- Advertisement -

जम्मू-कश्मीरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढत देवदर्शनाच्या यात्रेसाठी गेलेल्या बसला लक्ष्य केलं आहे.

यात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या रियासीमधील शिवखोरी येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर रविवारी हल्ला झाला. त्यानंतर बस खोल दरीत कोसळून १० जण ठार झाल्याची माहिती आहे.

बसमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचं माहिती समोर आली आहे. आलेय. रविवारी संध्याकाळी ६.१५ मिनिटांनी संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. या दुर्घेटनेत दहा जणांना मृत्यू झाला आहे. तर जखमी प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या