Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : मौजमजेसाठी चोरलेल्या 12 दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद

Crime News : मौजमजेसाठी चोरलेल्या 12 दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. विशेष म्हणजे केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणार्‍या या चोरट्याकडून तब्बल 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सहा लाख 60 हजार रूपये इतकी आहे. या कारवाईमुळे तोफखाना पोलीस ठाण्यातील चार आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना देत चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व त्यांच्या पथकाने गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली करणार्‍या एका इसमाला विना नंबरच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आले.

चौकशीत त्याने आपले नाव कृष्णा उमेश अंतरकर (वय 29, रा. शिवशक्ती नगर, ता. पाथर्डी) असे सांगितले. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या संशयित आरोपीची अधिक कसून चौकशी केली असता त्याने अहिल्यानगर शहरातील विविध भागांतून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या 12 दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.

ताज्या बातम्या

मुंढे इफेक्ट फक्त किचनमध्ये नको, एफडीएच्या कार्यालयातही दिसावा; संजय राऊतांचे तुकाराम...

0
मुंबई । Mumbai आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे...