Monday, May 25, 2026
Homeदेश विदेशGulmarg Crisis: हवेतच केबल कार थांबली, ३०० पर्यटक कॅबीनमध्ये अडकले; लष्कराचं रेस्क्यू...

Gulmarg Crisis: हवेतच केबल कार थांबली, ३०० पर्यटक कॅबीनमध्ये अडकले; लष्कराचं रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय झालं?

जम्मू-काश्मीर | Jammu Kashmir
जम्मू-काश्मीरमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. गुलमर्ग येथील आशियातील सर्वात मोठ्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या गोंडोला रोपवेमध्ये अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व केबिन हवेतच थांबल्याची घटना घडली. केबीन अचानक मध्येच थांबल्याने पर्यटकांमध्ये एकच घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच लष्कर, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंडोलो रोपवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सेवा अचानक थांबली आणि रोपवेमध्ये सुमारे ३०० पर्यटक अडकून पडले. लष्कराची ‘9 राज रायफल्स’ तुकडी, जम्मू-काश्मीर पोलीस आणि नागरी प्रशासन यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच बचावकार्यावर देखरेख करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि तांगमार्गचे तहसीलदार देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे
जम्मु-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस आणि गारपीट होत असल्यामुळे गुलमर्गमध्ये हवामान प्रचंड खराब आहे. अशा खराब हवामानात शेकडो फूट उंचावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढणे हे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान होते. तरीही, रेस्क्यू टीम्स आणि गोंडोलाच्या क्यूआरटी टीमने शिडी आणि रोपच्या मदतीने केबिनपर्यंत पोहोचून अथक परिश्रमानंतर बहुतांश पर्यटकांना सुखरूप खाली उतरवले आहे. तांत्रिक पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मोटर थांबवण्यात आली असून संपूर्ण केबल सिस्टम मजबूत असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आधी जावई-व्याहींसह पंतप्रधानांची भेट नंतर सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका; म्हणाल्या…

नायब राज्यपाल बचावकार्यावर लक्ष ठेऊन
या घटनेचे गांभीर्य ओळखून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा स्वतः या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले की, “तांत्रिक बिघाडामुळे गुलमर्ग गोंडोला सेवा तात्काळ बंद करण्यात आली असून सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व केबिनमधील पर्यटक पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रशिक्षित टीम बचावकार्यात गुंतल्या असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, त्यामुळे पर्यटकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही.”

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : पहिल्या दिवशी पाटी कोरीच; आमदाराच्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) नामनिर्देशन पत्र विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी राजकीय...