Friday, May 3, 2024
Homeनगररेखा जरे हत्याकांड : बोठेच्या अटकेनंतरच तपासाला गती मिळणे शक्य!

रेखा जरे हत्याकांड : बोठेच्या अटकेनंतरच तपासाला गती मिळणे शक्य!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापी फरारच असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

- Advertisement -

मात्र, जोपर्यंत बोठे पोलिसांच्या हाती लागत नाही, तोपर्यंत या हत्याकांडाचा पुढील तपास थांबणार आहे. बोठेच्या अटकेनंतरच या हत्याकांडाचा उलगाडा होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास थंडावला असल्याचे चित्र असले तरी बोठे याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली. या हत्याकांडात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. बोठे याने सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.

यामुळे बोठे याला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. या घर झडतीदरम्यान पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे लागले असल्याचे समजते. बोठे याच्या घर झडतीत त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये महत्वाची माहिती पोलिसांना मिळणार आहे.

परंतू, त्याचा लॉक उघडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली आहे. सध्या पोलिसांकडे असलेल्या पुराव्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यासाठी बोठे याला अटक करणे गरजेचे आहे. एलसीबीसह तपासी अधिकार्‍यांची पथके बोठेचा शोध घेत आहे.

नजरा आता खंडपिठाकडे

बाळ बोठे याचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळा असून आता तो औरंगाबाद खंडपिठात अटकपूर्वसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे जिल्ह्यासह पोलीसांच्या नजरा खंडपिठाकडे लागून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या