Friday, May 3, 2024
Homeनगरजातप- त्रिंबकपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या विरोधात न्यायालयात धाव

जातप- त्रिंबकपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या विरोधात न्यायालयात धाव

टाकळीमियॉ |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील जातप- त्रिंबकपूर ग्रामपंचायत निवडणूक अवैध झाली म्हणून ही निवडणूक रद्द करून प्रभाग क्र. 2 ची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी या निवडणुकीतील पराभूत उमेदवार शेख आरफान आमिन यांनी राहुरी येथील दिवाणी न्यायालयात केली आहे.

- Advertisement -

जातप-त्रिंबकपूर ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणूक दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी झाली. या निवडणुकीमध्ये अर्जदार शेख अरफान अमिन हे जातप-त्रिंबकपूर ग्रामपंचायतीचे वॉर्ड क्र. 2 मधून उमेदवारी करीत होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) प्रमाणे मतपत्रिकेचा नमुना अर्जदार यांना प्रचारार्थ दिलेला होता. त्यामध्ये प्रभाग क्र. 2 मध्ये अ. न. 1 म्हणून सदर अर्जदाराचे नांव व चिन्ह असे नमूद केलेले होते.

परंतु प्रत्यक्षांत निवडणूक मतपत्रिकेचे मशिनला अर्जदार यांचे नाव अनुक्रम नंबर 3 ला दर्शविण्यांत आले. त्यामुळे निरक्षर मतदारांचा गोंधळ होऊन त्यांनी अ. नं.3 ला मतदान करण्याऐवजी अ. न. 1 ला मतदान केल्यामुळे अर्जदार यांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे झालेली जातप ग्रामपंचायतीची निवडणूक ही बेकायदेशिर, चुकीची व अवैध आहे, म्हणून ही निवडणूक रद्द करुन प्रभाग क्र. 2 ची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशा आशयाचा अर्ज अर्जदार शेख आरफान आमिन यांनी राहुरी येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठस्तर यांचे कोर्टात इले. पिटीशन क्र. 1 / 2022 चा दाखल केलेला आहे. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड. भगवान कुंभकर्ण व अ‍ॅड. शिवाजी सांगळे हे काम पाहत आहेत.

सदर प्रकरणामध्ये न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राहुरी यांचे विरुध्द नोटीस काढली असल्याची माहिती श्री. शेख यांचे वकील अ‍ॅड. भगवान कुंभकर्ण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या