Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारजवान दीपक गायकवाडवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान दीपक गायकवाडवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नवापूर तालुक्यातील नावली मोग्राणी येथील एसआरपीएफ जवानाचा काल दि.29 रोजी गडचिरोली येथे सेवा बजावतांना हृदयविकाराने मृत्यू झाला.

- Advertisement -

आज त्याचे पार्थिव मोग्राणी येथे आणण्यात येवून शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोग्राणी (ता.नवापूर) येथील दीपक लक्ष्मण गायकवाड (32) हा सन 2014 साली एसआरपीएफमध्ये भरती झाले होते.

काल सकाळी गडचिरोली येथे सेवा बजावत असतांना दीपक गायकवाड याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला.

गडचिरोली येथून कै.दीपक गायकवाड याचे पार्थिव मोग्राणी गावात दाखल झाले व अंत्यसंस्कार करण्यात आला. कै.गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे. दौंड , कोल्हापूर या ठिकाणी सेवा दिल्यानंतर तीन महिन्यापूर्वी दीपक लक्ष्मण गायकवाड यांची गडचिरोलीला बदली झाली होती.

दिपक कोकणी एसआरपीएफ दलामधील जवान म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने एसआरपीएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिपक कोकणी (गायकवाड ) यांचे लहान बंधू मणिलाल कोकणी यांना काल फोन करून घटनेबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच घरातील नातेवाईकांनी आक्रोश केला. दिवसभरात सोशल मीडियावर स्व. दिपक कोकणी (गायकवाड) यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. मंगळवारी गडचिरोलीहून नंदुरबार येथे सुमारे 21 तास प्रवास करत दीपक यांचे पार्थिव राहत्या गावी आणण्यात आले.

दीपक लक्ष्मण कोकणी यांचा जन्म नवापूर तालुक्यातील मोग्राणी या गावी 30 डिसेंबर 1989 ला जन्म झाला. त्यांचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण शासकीय माध्यमिक आश्रम शाळा नावली येथे झाले.

ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार खेळात अग्रेसर असल्याने त्यांनी पाचवीत नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना नवापूर तालुक्यातील आदर्श शासकीय आश्रम शाळा देवमोगरा प्रवेश घेतला.

पाचवी ते दहावीपर्यंत देवमोगरा शासकीय आदर्श विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण अ‍ॅग्री. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा येथे पूर्ण केले. त्यानंतर नंदुरबार येथे फायर इंजिनिअरिंग चा कोर्स करण्यासाठी गेले.

त्यानंतर ते 2013-2014 साली एसआरपीएफ दलात भरती झाले. पहिली नेमणूक पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झाली. त्यानंतर कोल्हापूर-मुंबई सह नक्षलग्रस्त भाग गडचिरोली असे अनेक भागात त्यांनी देशासाठी सेवा बजावली आहे.

त्यांच्यावर शासकीय इतमामात मोग्राणी येथे दुपारी 2 वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या राहत्या घरुन फुलांनी सजवलेल्या रथावर अंत्ययात्रा काढण्यात आली.

जवान दिपक कोकणी यांचा अग्रस्थानी फोटो लावण्यात आला होता. अंत्ययात्रेत ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत अखेरचा निरोप दिला. जवान दिपक कोकणी अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.

पोलीस शिपाई 638 बटालियन क्रमांक 16 यास कोल्हापूर व गडचिरोली येथील पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रविण माने पाटील, पोलीस शिपाई मयुर मोरे, अभिजित हेरले, दिपक कोकणी यांच्या सह कोल्हापूर येथुन 8 जवान व गडचिरोली येथुन 4 जवान हे स्व दिपक कोकणी यांच्या पार्थिवाला घेवून आले. यावेळी नवापूर पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, जिल्हा परिषद सदस्या रमिला चौरे, परिसरातील सरपंच यांच्या सह नंदुरबार राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक डी.के.राजपूत, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, धुळे राज्य राखीव पोलीस दल पोलीस उपनिरीक्षक पी.के.मुलेमुले यांच्यासह 30 पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थित शासकीय इतमामात मानवंदना देत बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या