Sunday, October 13, 2024
Homeनगरघाबरुन जावू नका, कुणाचीही मोटार बंद होऊ देणार नाही

घाबरुन जावू नका, कुणाचीही मोटार बंद होऊ देणार नाही

सोनई |वार्ताहर| Sonai

जायकवाडी बॅकवॉटर (Jayakwadi backwater) पट्ट्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन. कुणीही घाबरुन जावू नये. कुणाचीही मोटार बंद (Water Pump) होवू देणार नाही अशी ग्वाही जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांनी दिली.

- Advertisement -

जायकवाडी (Jayakwadi) पट्ट्यातील शेतकरी बांधवांची जायकवाडी पाटबंधारे (Jayakwadi Irrigation) अधिकार्‍यांकडून होणारी गैरसोय थांबावी यासाठी ना शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांनी पुढाकार घेत मुळा सहकारी साखर कारखाना (Mula Co-operative Sugar Factory) कार्यक्षेत्रावर शेतकरी व अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

नवीन परवाना काढताना व परवाना नुतनीकरण करताना होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी यंत्रेणेमार्फत स्वतंत्र सेलची निर्मिती करणार आहे. त्यामुळे ज्यांना नवीन परवाना काढायचा असेल, परवाना नुतनीकरण करायचे असेल त्यांनी या सेलकडे कागदपत्रे जमा करावी मी व्यक्तिगत सदर परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल कुणाही अधिकार्‍यास पैसे देऊ नये मी सदैव जायकवाडी बँकवाटर (Jayakwadi Backwater) क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा राहील.नेवासा तालुक्यातील घोगरगाव ते रामडोह या बँकवाटर पट्ट्यातील गावामधील शेतकर्‍यांच्या गोदावरी नदीपात्रामधून (Godavari River) शेतीसाठीपाईपलाईन आहेत.

या परिसरातील शेती पूर्णत: या पाईपलाइनच्या उपसा सिंचनावर अवलंबून आहे. पाणी परवाना नूतनीकरण करणे, पाणी पट्टी भरणे, पाणी परवाना वारसांच्या नावे हस्तांतर करणे, नवीन पाणी परवाना प्रस्ताव करणे, वीज कनेक्शन घेणे या कामांत शेतकर्‍यांची जायकवाडी पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक, अधिकारी यांचेकडून मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत होती यामुळे जायकवाडी पट्ट्यातील शेतकरी बांधवात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मनोगत व्यक्त करतांना ना शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) म्हणाले की जायकवाडी बॅकवाटर (Jayakwadi backwater) पट्ट्यातील पाईपलाईनधारकांनी कुठल्याही अधिकार्‍यांना पैसे देऊ नये ,कुणी पैसे घेऊन शेतकर्‍यांची अडवणूक करत असेल तर शेतकर्‍यांनी मला थेट फोन करावा तसेच जायकवाडी बँकवाटर पट्ट्यातील शेतकर्‍यांची नवीन परवाना काढतांना व परवाना नुतनीकरण करतांना होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी यंत्रेणेमार्फत स्वतंत्र सेलची निर्मिती करणार आहे त्यामुळे ज्यांना नवीन परवाना काढायचा असेल, परवाना नुतनीकरण करायचे असेल त्यांनी या सेलकडे कागदपत्रे जमा करावी मी व्यक्तिगत सदर परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल कुणाही अधिकार्‍यास पैसे देऊ नये मी सदैव जायकवाडी बँकवाटर क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा राहील कुणीही घाबरू नये कुणाचीही मोटार बंद होऊ देणार नाही असा धीर ना गडाख यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिला.

यावेळी उपस्थित जायकवाडी उपसा सिंचन विभागाच्या उपस्थित अधिकारी व कालवा निरीक्षक यांनाही शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढत समन्वय साधत काम करण्याच्या सूचना दिल्या. शेतकर्‍यांनी पैसे देऊ नये हे ना गडाख यांनी सांगताच उपस्थित शेतकर्‍यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

प्रास्ताविक दादासाहेब चिमणे यांनी केले. याप्रसंगी श्रीरंग हारदे, काकासाहेब शिंदे, आण्णासाहेब पटारे, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले, जगन्नाथ कोरडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या (Jayakwadi Irrigation Department) वतीने जायकवाडी लाभक्षेत्राचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी उपस्थित शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही ना. गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांच्या समक्ष उपस्थित शेतकर्‍यांना दिली.

करोना नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर नानासाहेब तुवर, कडुबाळ कर्डीले, जिल परिषद सदस्य दादासाहेब शेळके, नानासाहेब नवथर, अ‍ॅड. बन्सी सातपुते, गणेश ढोकणे, बाळासाहेब पाटील, रवींद्र शेरकर, कैलास झगरे, संदीप सुडके, अझर शेख, सुनील नजन, पी. बी. जाधव, कार्यकारी अभियंता पैठण, जायकवाडी सिंचनचे उपविभागीय अधिकारी अविनाश पांडुळे आदींसह घोगरगाव, बेलपिंपळगाव, गोधेगाव, प्रवरासंगम, मंगळापूर, गळनिंब, गोगलगाव, सलाबतपुर, शिरसगाव, वाकडी, रामडोह आदीसह विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.

कुणी पैसे मागितल्यास मला फोन करा

जायकवाडी बँकवाटर पट्यात शेतकर्‍यांकडून पैसे घेतले जात आहे याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. एकाही शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना पैसे द्यायचे नाही. तुम्हाला कुणी पैसे मागितले तर तात्काळ मला संपर्क करा. शेतकर्‍यावर पैसे घेऊन दबाव टाकून अन्याय केल्यास त्या अधिकार्‍याची गय केली जाणार नाही असे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी बैठकीत बोलताच शेतकर्‍यांनी टाळ्याचा कडकडाट केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या