Friday, May 3, 2024
Homeनगरजायकवाडीतून 30435 क्युसेकने विसर्ग

जायकवाडीतून 30435 क्युसेकने विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

जायकवाडीत काल सायंकाळी 7 वाजता 33 हजार 647 क्युसेकने नविन पाणी दाखल होत होते. याच वेळी या धरणातुन 30435 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. हे धरण 92.47 टक्के भरले होते. दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने काल रात्री 8 वाजता 9465 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

- Advertisement -

जायकवाडी जलाशयाचा साठा 90 टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरण प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सायंकाळी 6 वाजे नंतर या धरणाच्या 18 दरवाज्यातुन विसर्ग करण्यास सुरुवात झाली. सुरुवातील 9432 क्युसेक विसर्ग करण्यास सुरुवात झाली. तो वाढवत काल मंगळवारी रात्री 7 वाजता हा विसर्ग क्रमाक्रमाने वाढवत 30435 क्युसेक इतका करण्यात आला. यासाठी 10 ते 27 क्रमांकाचे दरवाजे उचलण्यात आले आहेत. या धरणात काल सायंकाळी 7 वाजता 92.47 टक्के इतका पाणी साठा झाला होता. 70.9 टिएमसी उपयुक्त पाणीसाठा या धरणात तयार झाला होता. तर या धरणात 33647 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. पाऊस अजुनही शिल्लक असल्याने नगर, नाशिक च्या धरणातुन विसर्ग जायकवाडीच्या दिशेने होवु शकेल.

दरम्यान नाशिक च्या धरण परिसरात काल दिवसभरात पावसाने अधुन मधून हजेरी लावली. त्यामुळे पाण्याची नविन आवकही मंदावली आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग मंदावले आहेत. दारणाचा विसर्ग काल सायंकाळी 8 वाजता 2196 क्युसेकवर आला होता. गंगापूरचा दोन दिवसांपुर्वीच बंद करण्यात आला आहे. कडवातुन काल सकाळी 6 वाजता 1396 क्युसेकने सुरु होता. तो काल दुपारनंतर 4 वाजता 353 क्युसेकवर आणण्यात आला.

वालदेवीतून 341 क्युसेक, आळंदीतून 447 क्युसेक, भोजापूर 450 क्युसेक, पालखेड 3008 क्युसेक तर होळकर पुलाजवळ गोदावरीतून 939 क्युसेकने विसर्ग मिळत होता. त्यामुळे हे सर्व पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सकाळी 6 वाजता 11906 क्युसेक विसर्ग सुरू होता. तो काल दुपारी 2 वाजता 9465 क्युसेक इतका होता. तो रात्रभर टिकून होता. गोदावरीत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 पर्यंत 44.7 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या