Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : जेऊर बायजाबाई येथे तरूणावर जीवघेणा हल्ला

Crime News : जेऊर बायजाबाई येथे तरूणावर जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या जामिनावर सुटकेनंतर जेऊर बायजाबाई (ता. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमाला विरोध केल्याच्या कारणावरून एका तरूणावर चौघांनी लोखंडी रॉड, चाकू, फायटर तसेच कठीण वस्तूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री घडली. मयुर मोहन मकासरे (वय 30, रा. जेऊर बायजाबाई) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम शरद जाधव, जाँय सुनील वाघमारे, दीपक नानाभाऊ वाघमारे, हर्षद सचिन वाघमारे (सर्व रा. जेऊर बायजाबाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. नेवासा येथील नितीन केंदळे याच्या सत्काराचा कार्यक्रम जेऊर बायजाबाई येथे आयोजित करण्यात आला होता. केंदळे हा जेलमधून जामिनावर सुटल्याचे सांगत, गावात बाहेरील व्यक्तीच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊ नये, असे मयुर मकासरे याने शुभम जाधव याला फोनवरून सांगितल्याच्या रागातून मयुर मकासरे यांच्यावर खूनी हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर, जामिनावर सुटलेल्या आरोपीचा गावातील सार्वजनिक चौकात सत्कार करून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सतीष खामक यांच्या फिर्यादीवरून दुसरा स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सुनील वाघमारे, विनायक वाघमारे, विनोद वाघमारे, दीपक वाघमारे, रमेश शिवराम वाघमारे, हर्षल वाघमारे, राँकी वाघमारे, गुंजन शिवाजी वाघमारे, अभिषेक खाडे, नितीन प्रमोद केंदळे व इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...