Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमAhilyanagar : जेऊर येथे अवैध मावा निर्मितीवर छापा

Ahilyanagar : जेऊर येथे अवैध मावा निर्मितीवर छापा

पोलीस व अन्न प्रशासनाची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे अवैधरित्या मावा व सुगंधी तंबाखू तयार करणार्‍या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत सुमारे दोन लाख 69 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी (9 जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास जेऊर बायजाबाई येथील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. प्रशांत रामदास मगर (वय 33, रा. मगरवस्ती, जेऊर बायजाबाई) हा आपल्या राहत्या घरालगत उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधी तंबाखू, कात्री सुपारी व आख्खी सुपारी यांचा वापर करून लोखंडी मशीनच्या सहाय्याने प्रतिबंधित अन्नपदार्थ मावा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

त्यानुसार एमआयडीसी पोलिसांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेथे तपासणी केली असता संबंधित व्यक्ती मावा तयार करताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी जागेची झडती घेतली असता सुगंधी तंबाखू, तयार मावा तसेच मावा निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या तीन लोखंडी मशीन असा एकूण दोन लाख 69 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक माणिक चौधरी, अंमलदार राजू सुद्रीक, आजिनाथ पालवे, किशोर जाधव, राहुल ढाकणे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जी. व्ही. जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी साजिदा मुल्ला यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...