Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशलालूंचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

लालूंचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

दिल्ली | Delhi

चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

- Advertisement -

लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. दुमका कोषागारातून १३.३ कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात त्यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यामुळे, आता लालूंचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालाआहे. सध्या, लालू दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.

चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांच्या विरोधात वेगवेगळे खटले दाखल झाले आहेत. यातील एका प्रकरणात त्यांना शिक्षा झाली तर अन्य एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना तब्येत खालावल्यामुळे ते काही काळ हॉस्पिटलमध्ये होते.

जामीन मिळाल्यामुळे लालू यादव घरी परतणार आहेत. झारखंड उच्च न्यायालयाकडून लालूंना जामीन मिळाल्याचे कळताच यादव कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. न्यायालयाकडून लालूंना न्याय मिळेल, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.

लालू यादव ७२ वर्षांचे आहेत. ते डिसेंबर २०१७ पासून जेलमध्ये आहेत. मार्च २०१८ मध्ये लालूंना चारा घोटाळा प्रकरणातील एका खटल्यात १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सीबीआय कोर्टाने ही शिक्षा ठोठावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या