Wednesday, October 28, 2026
Homeदेश विदेशJIO आयपीओची शेअर बाजारात जोरदार लिस्टिंग! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदार मालामाल, किती रुपयांवर...

JIO आयपीओची शेअर बाजारात जोरदार लिस्टिंग! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदार मालामाल, किती रुपयांवर लिस्टींग?

मुंबई | Mumbai
रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने बुधवारी, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय शेअर बाजारात दमदार पदार्पण केले असून हा भारताच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. कंपनीची शेअर बाजारातील सुरवात अत्यंत प्रभावी राहिली आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजवर कंपनीचे शेअर्स १,३५८ रुपयांच्या किमतीसह सूचीबद्ध झाले. यासह, १२.५ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गाठून, जिओ देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. ३० हजार २१३ कोटी रुपयांचा हा आयपीओ अनेक विक्रमांचा साक्षीदार ठरला आहे.

Jio Platforms चा शेअर BSE आणि NSE वर प्रति शेअर 1,358 रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीच्या 1,119 रुपये प्रति शेअर या इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअरने 21.36% प्रीमियमसह बाजारात दमदार एन्ट्री केली.

- Advertisement -

2,868 रुपयांचा फायदा
जिओ प्लॅटफॉर्म्सचा शेअर IPO च्या 1,119 रुपये इश्यू प्राइसच्या तुलनेत 1,358 रुपयांवर लिस्ट झाला. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना 13,428 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16,296 रुपये रिटर्न मिळाला. याचाच अर्थ एका शेअरची किंमत 239 रुपयांनी वाढल्याने एका लॉटमध्ये 2,868 रुपयांचा नफा झाला.

Welcome to the listing ceremony of Jio Platforms Limited. https://t.co/KlCbPE2wKx— Reliance Jio (@reliancejio) October 28, 2026

कंपनीची जबरदस्त कामगिरी
कंपनीची आर्थिक कामगिरी अत्यंत भक्कम राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सचा महसूल (Revenue from Operations) १४.६ टक्क्यांनी वाढून १.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) १५.१ टक्क्यांनी वाढून ३०,०४९ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा EBITDA १८.८ टक्क्यांनी वाढून ७६,२५५ कोटी रुपयांवर पोहोचला असून EBITDA मार्जिन ५१.९ टक्के नोंदवले गेले आहे.

शेअरहोल्डरही मालामाल
शेअरहोल्डर कॅटेगरीत 23 शेअर्सचा किमान लॉट मिळालेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंग प्राइसच्या आधारे 5,497 रुपयांचा फायदा झाला. तर HNI गुंतवणूकदारांना 180 शेअर्सवर 43,020 रुपयांचा लिस्टिंग गेन मिळाला.

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या

दुष्काळाच्या सावटात सिंहस्थासाठी अतिरिक्त नियोजन; दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय दिवाळीनंतरच

0
नाशिक | प्रतिनिधीराज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, ग्रामीण भागातून शहराकडे होऊ शकणारे स्थलांतर आणि आगामी सिंहस्य कुंभमेळ्याची वाढती पाण्याची गरज, अशा तिहेरी आव्हानांमुळे नाशिकच्या पाणी नियोजनाचा...