Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“तो इस्रायली असल्याने…”, ‘द काश्मीर फाईल्स’ वादात जितेंद्र आव्हाडांची उडी

“तो इस्रायली असल्याने…”, ‘द काश्मीर फाईल्स’ वादात जितेंद्र आव्हाडांची उडी

मुंबई | Mumbai

इफ्फीचे ज्युरी हेड नादेव लॅपिड (Nadav Lapid) यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाला अश्लिल आणि प्रचारकी म्हटल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. लॅपिड यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की, “तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी ‘काश्मीर फाईल्स’ चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण ‘प्रचारकी आणि गलिच्छ’ चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदव लॅपिडने सणसणीत चपराक लगावली. ” असा टोला त्यांनी लगावला आहे.

इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या