Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी, अधिकार्‍यांची चौकशी सुरु

बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी, अधिकार्‍यांची चौकशी सुरु

संगमनेर (वार्ताहर) –

राज्यातील विविध विभागाअंतर्गत बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या सुमारे एकशे 88 उमेदवारांच्या विरोधात

- Advertisement -

गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास कामी शासनाच्या सर्व विभागाकडून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

राज्यात महाराष्ट्र अ‍ॅम्युचर असोसिएशन यांच्या वतीने 1998 ते 2005 या कालावधीत अ‍ॅम्युचर व टंबलींग क्रीडा स्पर्धांचे बनावट निकाल पत्राच्या आधारे, बोगस स्वाक्षरी, संघटनेचे बनावट प्रतिज्ञापत्र, बनावट प्रवेशअर्ज, परिशिष्ट तीन मधील बनावट फॉर्म नंबर 2 इत्यादी खोटे व बनावट कागदपत्रे प्रस्ताव सादर करून शासनाच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ घेतला आहे.

शासनाच्या विविध विभागात नोकरी मिळवली आहे. एकूण 259 उमेदवारांपैकी 71 उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 188 उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ,सदर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यातील 259 उमेदवारांपैकी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कोषागार अधिकारी यांना औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाने नोटीस पाठवली असून संबंधित जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय आस्थापनेत कार्यरत असलेल्या 259 आरोपींची नावे देण्यात आली असून त्यांचे वेतन भत्ते व आजपर्यंत त्यांना अदा करण्यात आलेली रक्कम इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे. यामुळे सध्या सेवेत असलेल्या प्रशासन सेवेचा लाभ घेणार्‍या संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

कोषागारांनी दिले आदेश

औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने राज्यातील जिल्हा कोषागार अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहे. संबंधित कोषागार यांनी त्यांच्या कार्यातून वेतन आधा केले जाणार्‍या संबंधित यंत्रणेला त्यासंबंधीची माहिती आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित कर्मचार्‍यांच्या विरोधात क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद विभागाच्या उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या