Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : पत्रकारावर हल्ला करणारे तिघे गजाआड

Crime News : पत्रकारावर हल्ला करणारे तिघे गजाआड

छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील पत्रकार सुशील थोरात व त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेतले. हेमंत उर्फ सोनु दत्तात्रय कोहक (वय 27, रा. बोल्हेगाव), महेश उर्फ पप्पु दशरथ मते (वय 27, रा. पाईपलाईन रोड, सावेडी) आणि प्रशांत शिवाजी निक्रड (वय 25, रा. तागडवस्ती, सावेडी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

20 ऑगस्ट रोजी थोरात यांच्या कारला सोनु कोहक याने त्याच्या दुचाकीने धडक दिली. या कारणावरून तसेच थोरात यांनी संशयितांच्या विरोधात बातम्या प्रसिध्द केल्याच्या रागातून वाद झाला. त्यानंतर सोनु कोहक, पप्पु मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड व एका अनोळखी इसमाने थोरात व त्यांच्या मुलास मारहाण केली होती. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली. उपनिरीक्षक विकास जाधव, संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाहीद शेख, राहुल व्दारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनील मालणकर, भगवान थोरात व प्रशांत राठोड यांच्या पथकांनी आरोपींचा समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान बातमीदारांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. 24 ऑगस्ट रोजी हेमंत कोहक हा त्याच्या साथीदारांसह छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पत्रकार थोरात व त्यांच्या मुलास मारहाण केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हेमंत कोहक व प्रशांत निक्रड हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष...