Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासण संक्रांतीचा, हर्षोल्हासाचा

सण संक्रांतीचा, हर्षोल्हासाचा

नाशिक । दिनेश सोनवणे Nashik

पतंग उडवत उडी उडी जाय… दिवसभर ढिल दे ढिलच्या किलकार्‍या, वकाट वकाट काटलेला पतंगचा Kites सध्या माहोल आहे. निमित्त आहे मकरसंक्रांतीचे. मकरसंक्रांत Makarsankranti Festival नववर्षातील पहिलाच सण. सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस. सूर्य या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायनात प्रवेश करतो. या दिवसानंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या दिवसानंतर हिवाळा हळूहळू संपू लागतो, तर उन्हाळ्याची चाहूल लागत असते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होत असतो.

- Advertisement -

हा सण देशात वेगवेगळ्या पद्धती आणि नावांनी साजरा होतो. यात उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये लोहरीLohri, पूर्व भारतात आसाम राज्यात भोगाली बिहू Bhogli Bihu तर पश्चिम भारतात गुजरात व राजस्थानमध्ये हा सण उत्तरायण म्हणून ओळखला जातो. तामिळनाडूत हा सण पोंगल Pongal या नावाने प्रसिध्द आहे.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा होतो.

पहिला दिवस भोगी, दुसर्‍या दिवशी मकरसंक्रांत आणि तिसर्‍या दिवशी किंक्रांती म्हणजेच कर असते. कुठल्याही भागात जा, 25 मैल अंतर पार केल्यावर भाषेचा लहेजा बदलतो, राहणीमानात बदल होतो, अगदी तसेच सण उत्सवांचे, रूढी परंपरांचेदेखील बदल होतात.

नाशिकमध्ये भोगीपासून हा सण साजरा करण्यास सुरुवात होते. यादिवशीची भाजी, स्नान याला वेगळे महत्त्व असते. तर जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकसह, कसमादे तालुक्यात मात्र क्वचितच भोगी साजरा होताना दिसते.

कसमादे परिसरातील वेगळा लहेजा असलेल्या अहिराणी बोलीत संक्रांतीला उतराण म्हणतात. यादिवशी सकाळी मांडे म्हणजेच खापरेवरची पुरण घालून पोळी तयार केली जाते. इतर सण उत्सवांच्या इतकेच महत्व या सणाला असते. दुपारी पूर्वजांना, देवांना नैवेद्य देऊन गोडधोड जेवणाचा आस्वाद घेतला जातो.

शहरात संक्रांतीच्या दिवशी जवळच्या व्यक्तीला तिळगुळ देतात. ’तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगून स्नेह, प्रेमात वाढ होण्यासाठी शुभेच्छा देतात. वयाच्या पाच वर्षांपर्यंत लहान मुलामुलींना या मकरसंक्रांतीच्या काळात बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे.

काळे कपडे घालून, हलव्याचे दागीने घालून सजवले जाते. तसेच हरभरे, उसाचे तुकडे, मुरमुरे, बोरं, हलवा, याचे मिश्रण त्यांच्या डोक्यावर टाकले जाते. आधुनिक काळात चॉकलेट, बिस्किटे, लहानांचे आवडते पदार्थ त्यांच्या डोक्यावरून टाकले जातात. स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम करून वाण लुटतात.

तिसर्‍या दिवशी म्हणजेच किंक्रांती किंवा करच्या दिवशी तांदळाच्या पीठाचे धिरडे काढले जातात, गुळवणी केली जाते. थंडीच्या दिवसात उष्ण तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. त्यामुळे तिळाचे, अनेक ठिकाणी कुरमुरे व गुळाचे लाडू तयार केले जातात व ते सायंकाळी तिळगूळ म्हणून वाटले जातात.

आपला देश हा कृषीप्रधान आहे. प्रत्येक सणाचा कुठे ना कुठे शेतीशी संबंध येणे ठरलेले आहे. यादिवशी अनेक भागात धान्याचे वाण एकमेकांना दिले जाते. हरभरे, ऊस, बोरे गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पणही करतात.

संक्रांतीच्या काळात आकाशात उंच उंच उडणारे पतंग दिसतात. महाराष्ट्रातील येवल्याचा पतंगोत्सव निराळा असतो. भोगी पासून या उत्सवाला सुरुवात होते तद्नंतर येवलेकर मनमुराद पतंग उडविण्याचा आनंद घेतात. करीच्या दिवशी पतंगोत्सवाची सांगता होत असते. मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी यात्राही भरतात. यावर्षीही करोनाचे सावट आहेच. त्यामुळे तिळगूळ वाटप, पतंग उडवताना सामाजिक अंतर, हातांची स्वच्छता, मास्कचा वापर करूनच सण उत्सव साजरा केले जावे हे मात्र नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या