Saturday, May 2, 2026
Homeक्राईमShrirampur : के. पी. सुपर मार्केट फोडणारे आरोपी जेरबंद

Shrirampur : के. पी. सुपर मार्केट फोडणारे आरोपी जेरबंद

1 लाख 20 हजार 630 रुपयाचा मुद्देमाल जप्त || श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील संगमनेर रोडवरील के.पी. सुपर मार्केट फोडणार्‍या दोन आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार 630 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहीती शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. दि. 22 ऑगस्ट रोजी रात्री सुमित शम्मीकुमार गुलाटी (वय 33) यांचे संगमनेर रोडवरील के.पी. सुपर मार्केट या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील 80 हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले. तपास पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली, तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच पथकास गुप्त बातमीदाकडून सदरचा गुन्हा अभय ऊर्फ किशोर समज केदारे, रा. वारुळाचा मारुती नालेगाव, अहिल्यानगर व समीर जाकीर सय्यद, रा. बुरुगाड रोड, जाहागिरदार चाळ, अहिल्यानगर यांनी त्यांच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा साथीदार अकबर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), अन्सार शेख (रा. नालेगाव, ता. अहिल्यानगर) यांच्यासह मिळून केला असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार 630 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत तोडमल, पोलीस नाईक भागवत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, सागर बनसोडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, पांडुरंग चौधरी, गणेश तुपे, मिरा सरग यांनी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भागवत शिंदे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये लढत; कुणाची बाजू...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून,अंतिम चार मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू...