Monday, May 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

Nashik Crime News : ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आईसोबत (Mother) झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात (Panchvati Area) घडली. देवेंद्र संजय थोरात (३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र थोरात यांचे त्यांच्या आईसोबत पैशांच्या (Money) कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास देवेंद्र यांनी नैराश्यातून घराच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. खाली पडल्यामुळे देवेंद्र यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे मेहुणे गौरव जयवंत वायकुळ यांनी त्यांना उपचारासाठी आडगाव नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणीअंती पहाटे मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) उपनिरीक्षक पंकज सोनवणे, सहायक उपनिरीक्षक दत्तू शेळके यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. मृत देवेंद्र थोरात यांच्या पश्चात आई आणि दोन मुले असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक! चाळीसगावात अशोक खरात सारखे प्रकरण उघड; प्रेमप्रकरणातून...

0
चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon नाशिकसह संपूर्ण राज्यात भोंदूगिरीकरुन लोकांची फसवणूक करणारा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगावातही देखील...