Sunday, May 5, 2024
Homeजळगावकन्नड घाट : वाहन चालकांडून प्रवशांची लुट

कन्नड घाट : वाहन चालकांडून प्रवशांची लुट

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे (Heavy rain) दरड कोसळ्याने गेल्या दिड महिनाभरापासून कन्नड घाट (Kannada Ghat) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मध्यतंरी घाटीची थोडीफार दुरुस्ती झाल्याने घाट फक्त दुचाकी व चारचाकी लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. मोठ्या वाहनांसाठी घाट बंद असल्याने चाळीसगाव ते कन्नड बस सेवा बंद आहे. याचाच फायदा घेत, खाजगी प्रवाशी वाहन (Private passenger vehicle) चालकांनी प्रवशांची लुट (Loot) सुरु केली आहे. ऐरवी चाळीसगाव ते कन्नड ५० ते ६० रुपये भाडे आकाcनारे वाहनधारक बस बंद असल्यामुळे प्रवशांकडून १०० ते १५० रुपये भांडे आकारत आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे त्याना महामार्ग व वाहतुकी पोलिसांचे पाठबल असून पोलिसांची व वाहनचालकांची चांगलीच आर्थिक कमाई होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. वाहनचालकांच्या मुजोरीचा अनुभव रोजच शेकडो प्रवशांना येत आहे.

पाटणादेवी डोंगर परिसरात दि,३१ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे चाळीसगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला होता. डोंगराच्या परीसरात पडलेल्या ढगफुटी सदृष्य पावसाचा फटका कन्नड घाटालाही बसला. कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने घाटात मोठ्या प्रमाणात गाळ व दगड वाहुन रस्त्यावर आला होता.

यात अनेक वाहनाचे नुकसान झाले. तेव्हा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मध्यंतरी घाटाची थोड्याफार प्रमाणात दुरुस्ती करण्यात आल्यामुळे दुचाकी व लहान वाहनांसाठी घाट सुरु करण्यात आला. परंतू घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालूच असल्याने एसटी व मोठ्या वाहनांसाठी घाट अद्याप बंदच आहे.

चाळीसगाव ते कन्नड दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. एसटी बंद असल्याने बसला पर्याय म्हणून लोक खाजगी वाहनाने चाळीसगाव ते कन्नड प्रवास करीत आहेत. त्याचाच गैरफायदा घेत खासगी वाहनधारक प्रवशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत होते. चाळीसगाव ते कन्नड बसचे भाडे ४५ रुपये आहे. तर खाजगी प्रवासी वाहतुकीचे ५० रुपये भाडे आहे. बस बंद असल्याने बसच्या तिकिट दरापेक्षा कमाल दीडपट भाडे खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालक आकारत आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवणारे महमार्ग व वाहतुक पोलिसांची देखील यात मिलीभगत असल्याची चर्चा आहे. दरमहिन्याला हप्त्यापोटी एक ठराविक रक्कम दोन्ही पोलिसांना मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे वाहनधारक बिनधास्तपणे प्रवशांची आर्थिक लुट करीत आहेत. यावर आरटीओ विभाग देखील कारवाई करण्यास दजावत नसल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे. कन्नडहुन मोठ्या प्रमाणात रुग्ण चाळीसगाव येथे उपचारासाठी येतात.

तर दररोज हजारो लोक कामानिमित्ताने चाळीसगाव ते कन्नड प्रवास करतात. गेल्या दिड महिन्यापासून खाजगी प्रवासी वाहनधारकाकडून लुट होत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतू दुसरा पर्याय नसल्यामुळे ते हा आर्थिक भार सहन करीत आहेत. आधिच कारोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यात अशा पद्धतीने लुट होत असल्यामुळे लोकांमध्ये व प्रवशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, वाहन चालकासह महामार्ग व वाहतुक पोलिसातील भ्रष्ट्र कर्मचारी व आधिकार्‍यांवर कारवाईची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या