Sunday, May 5, 2024
Homeजळगावकराडी ग्रामपंचायतीची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हातात!

कराडी ग्रामपंचायतीची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हातात!

पारोळा – प्रतिनिधी parola

तालुक्यातील कराडी ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीत (election) लोकनियुक्त सरपंच (Sarpanch) व सदस्य पदासाठी ७ जागेची आज माघारीची अंतिम प्रक्रिया पार पडली.

- Advertisement -

visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत

यात गावातील सलोख्याचा व विकासाचा दृष्टीकोनातून लोकनियुक्त सरपंचपदासह सात ग्रामपंचायत सदस्य आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडून आले.

visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत

यात बाळासाहेबांचा शिवसेनेच्या (shivsena) उमेदवार पूनम मनोहर पाटील यांची लोकनियुक्त सरपंच तर जयश्री संदीप पाटील, कमलबाई बाबूलाल भिल, प्रमिलाबाई विक्रम पाटील, जनाबाई रामकृष्ण पाटील, लताबाई सोमा भिल, कल्पनाबाई बापू पाटील व सुधाकर आनंदा पाटील यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कराडी ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांचा शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले असून आमदार चिमणराव पाटील यांनी लोकनियुक्त सरपंचासह बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

निमगूळ-दोंडाईचा रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक ; एक ठार, तीन जखमी

तसेच येणाऱ्या काळात गावातील मुलभूत सुविधेसह इतर विकासकामांचा लवकरच टप्प्या टप्प्याने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देखील यावेळी चिमणराव पाटील यांनी नवनियुक्त शिष्टमंडळास दिले. यावेळी मा.पंचायत समिती सदस्य भिडूभाऊ जाधव, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, लोणी बु सरपंच सहादू केदार, कराडी मा.लोकनियुक्त सरपंच रतन पाटील, धनराज प्रकाश पाटील, सतिश महारु पाटील, दीपक परशुराम पाटील, संदीप देविदास पाटील, राकेश राजेंद्र पाटील, विलास हिम्मत पाटील, ईश्वर संतोष पाटील, सजन श्रीपत भिल, वाल्मिक बाबूलाल भिल, प्रदीप वना पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत

- Advertisment -

ताज्या बातम्या