Saturday, October 24, 2026
Homeक्राईमCrime News : करंजी घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद

Crime News : करंजी घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || 7.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

करंजी घाट परिसरात वाहन अडवून लुटमार करणार्‍या सराईत चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

शिवाजी बाळासाहेब पाटेकर (वय 32, रा. ढोरजळगाव, ता. पाथर्डी) हे 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.45 वाजता त्यांच्या कारमधून प्रवास करत असताना करंजी घाटात त्यांना लुटले होते. पाटेकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये व त्यांच्या पथकाने संकेत चिंधू पडवळ (वय 25) व नामदेव बाळासाहेब भोकसे (वय 28, दोघे, रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.

दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार जगदीश सुरेश शिवेकर (रा. करंजविहिरे, ता. खेड, जि. पुणे) याच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. मात्र शिवेकर सध्या पसार असून त्याचा शोध सुरू आहे. ताब्यातील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दोन मोबाईल असा एकूण 7 लाख 90 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...