Sunday, May 10, 2026
Homeक्राईमकरंजी घाटात अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

करंजी घाटात अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

करंजी |वार्ताहर| Karanji

कल्याण निर्मळ राष्ट्रीय मार्गावरील (Kalyan Nirmal National Highway) करंजी घाटामध्ये (Karanji Ghat) माणिकशहा पिरबाबा दर्गा जवळील धोकादायक वळणा जवळ एका वीस फूट खोल दरीमध्ये अंदाजे वय 35 वर्ष असलेल्या एका अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह (Dead Body) रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

करंजी घाटामध्ये (Karanji Ghat) एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह पोलीस उपधीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक लिमकर, जगदीश मुलगीर, विलास जाधव यांच्यासह करंजी पोलीस चौकीचे हवालदार दळवी, कुसळकर, बेरड, बुचकूल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मयत व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) खोल दरीतून वरती काढण्यात आल्यानंतर या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला आढळला. हा घातपाताचा प्रकार आहे की काय? त्या दृष्टीने पोलीस (Police) पुढील तपास करणार आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलिसात (Pathardi Police) गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. करंजी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये डबल हेडर; CSK समोर LSG चे...

0
मुंबई | Mumbai आयपीएल (IPL) स्पर्धेचा १९ वा हंगाम निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असून, अंतिम ४ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अजूनही १० संघ शर्यतीत...