Friday, May 3, 2024
Homeनगरतलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

तलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील निंबे येथे ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊस तोडणी कामगाराचा हा मुलगा होता. साजन सावंत असे मयत मुलाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी, पाटोदा तालुक्यातील ऊस तोडणी कामगार निंबे येथे वास्तव्यास आहे. धुणे धुण्यासाठी भवानी माता तलावावर गेलेल्या आईसोबत हा मुलगा होता. मात्र आईची नजर चुकवून हा मुलगा बाजूला गेला आणि तलावात बुडाला. काही वेळानंतर या दुर्घटनेची माहिती मिळाली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या