Friday, May 3, 2024
Homeनगरसिना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारी ६ वाहने जप्त

सिना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारी ६ वाहने जप्त

कर्जत | प्रतिनिधी

नागलवाडी येथील सिना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा वाहनांवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या पथकाने कारवाई केली. सर्व वाहने प्रांताधिकारी कार्यालय येथे जमा करण्यात आली आहेत. अनेक दिवसांनी झालेल्या महसुलच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

- Advertisement -

गुरुवार, दि २७ रोजी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना नागलवाडी येथील सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तहसीलदार नानासाहेब आगळे यांना कारवाईसाठी पथक तयार करण्याच्या सुचना दिल्या. या पथकाच्यासम कारवाई दरम्यान सीना नदी पात्रातून एक जेसीबी, एक टिपर आणि चार ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करताना आढळून आले. पथकाने सर्व सहा वाहने पथकाने ताब्यात घेत कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून जमा करण्यात आली. या वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७) नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मनोज भोसेकर, तलाठी गणेश सोनवणे, निलेश साळुंके, अविनाश रोडगे, धुळाजी केसकर, हरिश्चंद्र नांगरे, दिनेश वास्ते, दिपक बिरुटे, अभिजीत शेलार, विकास सोनवणे, उदय गलांडे यांच्यासह मिरजगाव दुरक्षेत्रातील पाच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या