Friday, May 3, 2024
Homeजळगावविद्यापीठातील कागद घोटाळ्याची चौकशी करा

विद्यापीठातील कागद घोटाळ्याची चौकशी करा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये होत असलेल्या कागद घोटाळ्याची चौकशी करुन कारवाई करावी,अशी मागणी जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटना एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. वायुनंदन यांच्याशी चर्चा केली.

- Advertisement -

गेल्या चार वर्षांपासून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचे दिसून आलेले आहे.

प्रभारी कुलगुरू पूर्णवेळ विद्यापीठात नसल्यामुळे व त्यांना बरीच माहिती नसल्याचा फायदा घेऊन पात्रता नसलेल्या सदस्यांना देखील केवळ स्वतःच्या मर्जीतील असल्यामुळे व आगामी काळामध्ये केलेला काळाबाजार लपविला गेला पाहिजे या हेतूपोटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य पदी तसेच विद्यापीठाच्या विविध विभागाच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात येत आहे.

म्हणजेच विद्यापीठामध्ये सध्या अशा प्रकारच्या चुकीच्या नियुक्त्या देऊन एक प्रकारे कागद घोटाळा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठाचा अजब कागद घोटाळा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामध्ये सध्या प्रत्येक कागद हा लाखो रुपये किमती एवढा झालेला आहे.

विद्यापीठांमधील ऑक्टोंबर 2020 चे परीक्षेचे बिल तब्बल पाच कोटी रुपये इतके झालेले होते. गेल्या चार वर्षांपासून एकाच पार्टीला परीक्षा विभागाचे काम कुठलीही निविदा प्रक्रिया पार न पाडता दिल्या जात आहे. असा आरोप देवेंद्र मराठे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या