Thursday, May 2, 2024
Homeनगरकेडगाव, नागापूर व बुर्‍हाणनगरच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

केडगाव, नागापूर व बुर्‍हाणनगरच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव, नागापूर एमआयडीसी येथील रेणुका माता मंदिर व बुर्‍हाणनगर येथील तुळजाभवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आज, सोमवार सकाळी या तिन्ही मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नगर शहर, नागापूर एमआयडीसी, भिंगार, सावेडी उपनगरासह जिल्हाभरातून लाखो भाविक नवरात्रीच्या काळात दर्शनासाठी येतात. दोन वर्षांच्या कालखंडानंतर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असल्याने यावर्षी भाविकांची अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. या दृष्टीकोनातून मंदीर व्यवस्थापनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

बुर्‍हाणनगर येथील मंदिरात बुधवारी तिसर्‍या माळेला तुळजापूर येथे जाणारी पालखी येणार आहे. केडगाव व नागापूर एमआयडीसीतील मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात बुधवारी घटस्थापना झाल्यानंतर दसर्‍यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान मंदिर परिसरात नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

पूजा साहित्य, हार फुले यासह खेळणी, इतर वस्तू व खाद्य पदार्थ स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. मंदीर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मंदीर व्यवस्थापनाकडून भाविकांच्या सुविधा व मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या