Thursday, May 2, 2024
Homeजळगावमहासभेत गाळ्यांच्या विषयावरुन खडाजंगी

महासभेत गाळ्यांच्या विषयावरुन खडाजंगी

जळगाव / jalgaon

मनपाच्या Jalgaon Municipal Corporation ताब्यात असणार्‍या आणि भविष्यात ताब्यात घेण्यात येणार्‍या गाळे वाटप धोरणासंदर्भात Allocation of floors policy निर्णय घेण्याच्या विषयावरुन शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी Khadajangi झाली. दरम्यान,हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.तसेच विषय पत्रिकेवरील लेखापरिक्षणाचा प्रस्ताव वगळता अन्य ८२ विषयांना मंजुरी देण्यात आली.
मनपाची ऑनलाइन महासभा Online general meeting of the muncipal corporation महापौर जयश्री महाजन Mayor Jayashree Mahajan यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील,आयुक्त सतीश कुलकर्णी,नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.

- Advertisement -

शिवसेना -भाजप नगरसेवकांमध्ये तुतु-मैमै

मनपाने जप्त केलेल्या गाळ्यांबाबत आणि भविष्यात गाळे ताब्यात घेतल्यानंतर वाटप संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या विषयावर चर्चा झाली.गाळ्यांच्या धोरणाबाबत आज जर निर्णय घेतला तर अडचण निर्माण होईल.त्यामुळे हा विषय तहकुब करावा अशी मागणी विशाल त्रिपाठी यांनी केली.यावर नितीन लढ्ढा यांनी हा निर्णय मनपाने ताब्यात घेतलेल्या गाळ्यांचा विषय आहे असे सांगत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

भाजपने गाळेधारकांची दिशाभूल केली असून आता सहानुभूतीचा आव आण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. त्यावर विशाल त्रिपाठी यांनी भाजपचे सरकार असतांना पाठपुरावा केल्याचे सांगताच लढ्ढा यांनी मनपात भाजपची सत्ता असतांना निर्णय का नाही घेतला असा सवाल उपस्थित केला.हाच धागा पकडून रविंद्र घुगे-पाटील म्हणाले की,मनपात आमची केवळ अडीच वर्ष सत्ता होती.शिवसेनेची इतकी वर्ष सत्ता होती तर यापूर्वी का? निर्णय घेतला नाही असा टोला लगावला. तसेच ऍड.शुचिता हाडा यांनीही हा विषय तहकुब ठेवण्याची जोरदार मागणी केली.तसेच हा विषय केवळ सद्यस्थितीत असलेल्या ८० गाळ्यांचा आहे. भविष्यात अन्य संकुलातील गाळे ताब्यात घेण्याचा विषय अभिप्रेत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

नगरसेवकांच्या संभ्रमानंतर आयुक्तांचा खुलासा

गाळ्यांच्या विषयावर नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे लक्षात येताच आयुक्त संतीश कुलकर्णी यांनी यावेळी खुलासा केला.ते म्हणाले की,काही गाळे जप्त केले आहेत.त्यासंदर्भात हा विषय आहे.या निर्णयाला काही अडचण निर्माण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.२०१८ मध्ये शासनाने अधिनियमात दुरुस्ती केली.२०१९ मध्ये नवीन नियम झालेत.२०१८ प्रमाणे नूतनीकरण करण्याची संधी आहे.

जे नूतनीकरणास पात्र आहेत त्यांना नूतनीकरण करुन दिले जाईल.आणि जे पात्र नाहीत ते गाळे ताब्यात घेवून लिलाव केला जाईल असे सांगितले.त्यानंतरही भाजपच्या नगरसेवकांनी हा विषय तहकुब ठेवण्याची मागणी केली.मात्र बहुमताच्या जोरावर सत्ताधार्‍यांनी बहुमताने ठराव मंजूर केला.

मार्केट वसुलीतून विकासकामे करण्याचा ठराव

मनपाने जप्त केलेल्या गाळ्यांबाबत आणि भविष्यात गाळे ताब्यात घेतल्यानंतर वाटप संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर नितीन लढ्ढा यांनी मार्केट वसुलीतून जमा होणारा निधी विकासकामांसाठी वापरावा याबाबत ठराव करावा तसेच ही रक्कमा एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करावी अशी सूचना मांडली.दरम्यान,मार्केट वसुलीतून जमा झालेल्या रकमेतून विकासकामांसाठी प्राधान्य देण्याचा ठराव देखील बहुमताने मंजूर करण्यात आला.

आकृतीबंधातील आकडेवारी मोघम

मनपाच्या सुधारित आकृतीबंधाच्या प्रस्तावावरुन नगरसेवक चेतन सनकत यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.मनपाने तयार केलेल्या आकृतीबंधातील आकडेवारी मोघम असल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच सफाईकामगारांची पदे भरतांना कमी करु नये.असे सनकत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

हाच मुद्दा उपस्थित करत प्रशांत नाईक यांनी छायाचित्रकार पदाचाही समावेश करण्याची शिफारस केली.त्यानंतर कैलास सोनवणे यांनी प्रशासनाचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगत कायदेशीर बाबी तपासाव्या अशी मागणी केली.दरम्यान,महापौर जयश्री महाजन यांनी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्यावर जाणार नाही. यादृष्टीने प्रशासनाने सुधारित आकृतीबंध तयार करुन शासनाकडे पाठविण्याची सूचना केली.

लेखापरिक्षणाचा अहवाल न दिल्याने प्रशासनावर नाराजी

सन १९९१-९२ ते १९९७-९८ या वर्षातील लेखापरिक्षण अहवालातील माहिती सभागृहात देण्यासंदर्भात प्रशासकीय प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला.मात्र लेखापरिक्षण अहवाल सदस्यांना न दिल्याने हा प्रस्ताव तहकुब करावा अशी मागणी चेतन सनकत यांनी केली.तसेच विशाल त्रिपाठी यांनी सदस्यांना लेखापरिक्षण अहवालाची माहिती का? दिली नाही असा सवाल उपस्थित केला.दरम्यान,महापौर जयश्री महाजन यांनी हा ठराव तहकुब ठेवला.

बंडखोर गटनेता,उपगटनेता निवडीला विरोध

मनपातील भाजपच्या ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवकांनी बंजखोरी केली. त्यामुळे भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक घेवून गटनेतेपदी ऍड.दिलीप पोकळे तर उपगटनेतेपदी चेतन सनकत यांची निवड केली आहे.गुरुवारी झालेल्या महासभेत सुरुवातीलाच नवनाथ दारकुंडे यांनी निवडीबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मात्र भाजपचे नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी भाजपचा विरोध असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या