Friday, May 3, 2024
Homeनगरअखेर खानापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

अखेर खानापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

माळवाडगाव (वार्ताहर) –

श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीची निवडणूक आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार

- Advertisement -

घेतल्याने सर्वपक्षीय लोकसेवा महाविकास आघाडीचे 9 जागांसाठी 9 च उमेदवारी अर्ज राहिल्याने अखेर निवडणूक बिनविरोध झाली.

नऊ सदस्य संख्या असलेली खानापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकसेवा, महाविकास आघाडी स्थापन करण्यात येऊन सर्वपक्षीय नऊच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित झालेले असताना,दोन उमेदवारी अर्ज अचानक दाखल झाल्याने बिनविरोध प्रस्ताव बारगळतो की काय?असा पेच निर्माण झालेला होता काल दि. 4 रोजी अर्ज माघारीचे दिवशी अंतीम टप्प्यात दोन उमेदवारांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतल्याने 9 जागांसाठी नऊच उमेदवारी अर्ज राहील्याने निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक बिनविरोध घोषीत केली.

9 जागांवर बिनविरोध घोषीत करण्यात आलेले उमेदवार हे सर्वपक्षीय लोकसेवा,महाविकास आघाडीचे उमेदवार असून नवनिर्वाचित सदस्य प्रभाग 1- दत्तात्रय रामचंद्र आदिक,मिना वाल्मिक आदिक, रावसाहेब कडू पवार, प्रभाग- 2 योगीता गोविंद आदिक ,संगीता संजय बर्डे, भाऊसाहेब बाबुराव जगताप,प्रभाग – 3 ज्ञानदेव चांगदेव आदिक,रेवती अमोल आदिक,ज्योती सुर्यकांत जगताप असे आहेत . खानापूर येथील स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्ते,तरुण मंडळे ,ग्रामस्थ यांचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले या सर्वांचे तालुका, जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोघा तरुणांचा मनाचा मोठेपणा

सर्वपक्षीय मंडळाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली असतानाही माजी उपसरपंच निलेश सुरेश आदिक यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्नी सुरेखा निलेश आदिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन जागा रिक्त करून दिली. दुसरा अर्ज सोन्याबापू कडूभाऊ आदिक यांनीही गावच्या भल्यासाठी अर्ज मागे घेतला. मनाचा मोठेपणा दाखवून या दोघा तरुणांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्याने कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या