Thursday, September 17, 2026
HomeजळगावPhoto शाहीर शिवाजीराव पाटील यांना खान्देश भूषण पुरस्कार जाहीर

Photo शाहीर शिवाजीराव पाटील यांना खान्देश भूषण पुरस्कार जाहीर

नगरदेवळा – वार्ताहर pachora

नगरदेवळा येथील समाज भूषण शाहीर शिवाजीराव पाटील, पद्मश्री राहीबाई पोपेरे व उद्योजक प्रशांत पाटील यांना यंदाचा प्रतिष्ठेचा खान्देश भूषण पुरस्कार (Khandesh Bhushan Award) जाहीर करण्यात आला असून कल्याण येथील कार्यक्रमात दि.२९ एप्रिल रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

- Advertisement -

(North Maharashtra) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास महामंडळ कल्याण (mumbai)) मुंबई तर्फे आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सवात यंदाच्या सहाव्या वर्षी भव्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या वर्षीचे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘खान्देश भूषण’ पुरस्कार आज मुंबईतून जाहीर करण्यात आले.

यामध्ये खानदेशातील लोकप्रिय शाहीर समाजभूषण शिवाजीराव पाटील नगरदेवळा..,.

पद्मश्री राहीबाई पोपेरे बीजमाता

खानदेशातील सुप्रसिद्ध उद्योजक प्रशांत पाटील यांना प्रतिष्ठेचे खान्देश भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले.

दि.२९ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण सायंकाळी सात वाजता केडीएमसी ग्राउंड खडकपाडा कल्याण मुंबई येथे विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असून यामध्ये शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या अहिराणी गीतांचा दर्जेदार कार्यक्रम देखील सादर केला जाणार आहे, असे खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : जोपूळ आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आश्रमशाळांमधील असुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी (दि.१७) सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील...