Sunday, May 5, 2024
Homeनगरखर्डा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर, भाजपच्या बाल्लेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सत्ता

खर्डा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर, भाजपच्या बाल्लेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सत्ता

जामखेड | Jamkhed

माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या तर अरणगाव

- Advertisement -

भाजपला धक्का तर नान्नजमध्ये 13 पैकी भाजपचे 7 जागा मिळाल्या असून जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 17 सदस्यांसाठी मतदान पार पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांचा करिश्मा ग्रामपंचायत निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. येथील जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा येथे भाजपला धोबीपछाड देण्यात राष्ट्रवादीच्या गटाला यश आलंय.

भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली असून राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. आ. रोहित पवार यांनी येथील ग्रामपंचायती निवडणुकीकडे स्वत:हून लक्ष घातले होते. त्याचाचा हा परिणाम असल्याचं दिसून येतंय. या निवडणुकीत विजयसिंह गोलेकर यांच्या खर्डा ग्रामविकास आघाडीने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.

खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 17 सदस्यांसाठी मतदान पार पडले होते. या 17 पैकी 11 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायतीने जिंकल्या आहेत. गत ग्रामपंचायतीत येथे भाजपाचे नेते माजी मंत्री राम शिंदेंच्या गटाचे वर्चस्व होते. मात्र, यंदा रोहित पवारांनी आपला करिश्मा दाखवून खर्डा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवालाय. निकालानंतर राष्ट्रवादी समर्थकांनी गावात जल्लोष केलाय.

- Advertisment -

ताज्या बातम्या