Wednesday, August 12, 2026
HomeनगरAhilyanagar : मोठ्या खंडानंतर पावसाला सुरूवात

Ahilyanagar : मोठ्या खंडानंतर पावसाला सुरूवात

दुपारनंतर आभाळात ढगांची दाटी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात मोठ्या खंडानंतर शनिवारी दुपारपासून भिज पावसाला सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मध्यम भिज पाऊस झाला असून या पावसामुळे खरीप हंगामात पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असून या पावसामुळे पेरणी झालेल्या खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.

- Advertisement -

यंदा जिल्ह्यात जून महिन्यानंतर जुलै महिन्यात कोसळणार्‍या पावसात मोठा खंड दिसत होता. निम्म्याहून अधिक जुलै संपला असून अद्याप जिल्ह्यात 60 टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झालेल्या नाहीत. सुमारे 15 दिवसापूर्वी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात समाधानकारक पाण्याची आवक झालेली असली तरी जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. विशेष करून उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

जुलै महिन्यात सुरूवातीला पाऊस झाल्यानंतर गेल्या 10 ते 15 दिवसापासून पावसाने सर्वदूर उघडीप दिली होती. यामुळे खरीप हंगामात पेरणी झालेली पिके तहानली होती. मात्र, शनिवारपासून पुन्हा पावसाने सुरूवात केली असून पुढील तिन ते चार दिवस पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली.

ताज्या बातम्या

Nashik News : साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त; यंदा १५ ऐवजी केवळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik  आगामी सिंहस्थात (Simhastha) कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. साधुग्राम...