Tuesday, May 20, 2025
Homeनाशिकखेडगाव, शिंदवडला ढगफुटी सदृश्य पाऊस; नद्यांना पूर

खेडगाव, शिंदवडला ढगफुटी सदृश्य पाऊस; नद्यांना पूर

दिंडोरी / खेडगाव । प्रतिनिधी / वार्ताहर Dindori / Khedgaon

- Advertisement -

आज (20) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास खेडगाव, शिंदवड, दिंडोरी, रणतळे शिवार, वनारवाडी, तळेगाव दिंडोरी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला होता. पावसामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रात्री ऊशिरापर्यंत पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिंडोरीजवळील रणतळे येथे रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शिंदवड, खेडगाव येथेही अनेक नद्या, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे कांही गावांचा संपर्क तुटला होता.

खेडगाव येथील किरण पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली. काही काळ तर वीज पुरवठा खंडीत झाला होता. गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभांवर सुध्दा या पावसाचा फटका बसला. वाहतुक कोंडी झाल्याने अनेकांना लग्न सोहळ्यास वेळेत पोहचता आले नाही. वर्‍हाडी मंडळीचे प्रचंड हाल झाले होते. काही ठिकाणी मंडप, घरांचे पत्रे, कौले उडाले तर विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी

0
पुणे | प्रतिनिधी अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तसेच दक्षिण कर्नाटकजवळील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे....