Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगाव : किराणा दुकान आगीत भस्मसात

मालेगाव : किराणा दुकान आगीत भस्मसात

मालेगाव । Malegoan

शहरातील नवीन बसस्थानकासमोरील बादशाह खान नगर मच्छिबाजारात आज (दि.१९) पहाटे शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरासह किराणा दुकान भस्मसात झाल्याने दोन लाखावर वित्तहानी झाली.

- Advertisement -

आग लागल्याचे लक्षात येताच कुटूंबियांनी घराबाहेर धाव घेतल्याने जिवीतहानी टळली. मच्छिबाजारात साजीद दिवान यांचे दोन मजली घर असून खालच्या मजल्यावर किराणा दुकान तर वरच्या मजल्यावर दिवान कुटूंबिय राहत होते.

सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शॉटसर्किट झाल्याने घरास आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दिवान कुटूंबियांनी आग लागल्याचे दिसताच घराबाहेर धाव घेतली. दिवान यांच्या घराबाजुला इतर लाकडांची घरे व झोपडपट्टी असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.

मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण प्रस्थापित केल्याने मोठी हानी टळली.

- Advertisment -

ताज्या बातम्या