Thursday, May 2, 2024
Homeजळगावशेंदुर्णीत भर वस्तीत युवकावर चाकू हल्ला.

शेंदुर्णीत भर वस्तीत युवकावर चाकू हल्ला.

शेंदुर्णी Shendurni ता जामनेर

येथिल कमल किसन नगरातील भर वस्तीत सायंकाळी ८ वा. जीम वरून येत असतांना अचानक पणे अक्षय वसंत गुजर (youth) वय २३ वर्ष याच्यावर पाच ते सहा जणांनी चाकुने वार (Knife attack) करून रक्तबंबाळ केला.

- Advertisement -

अक्षय गुजर हा दत्तनगर येथिल जीम आटोपुन घराकडे निघाला असता कमल किसन नगर येथे भर वस्तीत सायं. ८ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी दर्शन राजु गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामु विठ्ठल गुजर, सचिन अनिल धनगर आणि इतर तीन ते चार जणांनी जुन्या वादातुन येऊन वाद घालुन अक्षय याच्यावर चाकु व रॉडने पोटावर पायावर हातावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपी यांनी पळ काढला.

रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय याने एकाच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठत घटना सांगितली असता त्याला प्राथमिक उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवले. जखमीची अवस्था बघता अक्षय यास प्राथमिक उपचार करून जळगाव येथिल दवाखाण्यात दाखल केले.

तोपर्यंत पोलीसांनी कार्यवाहीचा बडगा उचलत तात्काळ आरोपींचा शोध सुरु केला असता. दोन संशयित यांना ताब्यात घेतले. इतर आरोपी यांचा शोध सुरु आहे. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी शेंदुर्णी येथे ठाण मांडून धडक कार्यवाही सुरु केली.

सदर जखमीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दर्शन राजु गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामु विठ्ठल गुजर, राजु भिला गुजर , सचिन अनिल धनगर आणि इतर जणां विरुध्द भादवि कलम ३०७ , व इतर कलमां वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पर्यंत कार्यवाही सुरु होती. गावात तणाव पुर्ण शांतता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या